दानत ही तुमच्याकडे किती आहे यावर अवलंबून नसते, तर ती तुमच्या देण्याच्या मानसिकतेवर असते. एखाद्या लहान मुलाकडे दोनच चॉकलेट्स असतीत तर त्यातलं एक तो दुसऱ्याला खुशीनं देईल. एखादं मूल आपल्याकडचे दोनही चॉकलेट्स देऊन टाकेल. तर दुसरे एखादे मूल त्याच्याकडं भरपूर चॉकलेट्स असूनही त्यातलं एकही दुसऱ्या कोणाला देणार नाही. इथं ‘मुलांचे पाय पाळण्यात दिसतात’ ही उक्ती लागू पडते. देणारी मुलं, पुढं त्यांच्यावर पालकांचे चुकीचे संस्कार झाले नाहीत तर आपल्या भावी आयुष्यात नक्कीच दानशूर आणि यशस्वी होतील. कारण देणाऱ्यांकडं भरभरून, चोहोबाजूने येत असतं. त्यांच्याकडं असतं म्हणून ते देत नसतात, तर त्यांना देण्याची सवय असते म्हणून त्यांच्याकडं येत असतं. तुम्हीही तुमच्या कमाईतला थोडा भाग नियमित दान करा. हे दान तुम्ही गरजूंना, विद्यार्थ्यांना, अनाथाश्रमाला, संकटग्रस्तांना करा. ते निरपेक्ष बुद्धीनं करा. या दानाचा डांगोरा पिटू नका. मग पहा तुमच्या जीवनात काय क्रांती होते ते!
Showing posts with label Mahaveer Sanglikar. Show all posts
Showing posts with label Mahaveer Sanglikar. Show all posts
Friday, 7 April 2017
Wednesday, 5 April 2017
चांगलं दिसा!
चांगलं असण्याबरोबरच चांगलं दिसणंही महत्वाचं आहे. तुम्ही कसं रहाता, कसं दिसता यालाही महत्व असतं. हे म्हणजे वस्तूंच्या पॅकिंगसारखं असतं. म्हणजे बाजारातली एखादी वस्तू कितीही चांगली असली पण तिचे पॅकिंग चांगले नसले तर त्या वस्तूला उठाव नसतो. माणसाचं पण तसंच आहे. तुमचा चेहरा उदास असला, तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये लोकांना आकर्षित करण्यासारखं कांही नसेल, तुमचे कपडे गबाळ्यासारखे असतील, तुमच्या चालण्यात, बोलण्यात आत्मविश्वास दिसत नसेल तर या जगात तुम्हाला किंमत मिळणार नाही. तुमचं हे दिसणं तुम्ही सुंदर आहात की नाही, काळे आहात की गोरे आहात यावर अवलंबून नाही. एक सुंदर चेहरा उदास असेल तर ती सुंदरता बिघडवतो, तर एक सो-सो चेहरा हसरा असला तर तो तुम्हाला आकर्षित करतो. चांगले कपडे तुम्हाला आणखी आकर्षक बनवतात. तेंव्हा उगीच आपलं ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’ असल्या उक्तीला बळी पडू नका, कारण तो एक भंकस आदर्शवाद आहे.
Subscribe to:
Posts (Atom)