Friday 7 April 2017

देत जावे, येत राहील!

दानत ही तुमच्याकडे किती आहे यावर अवलंबून नसते, तर ती तुमच्या देण्याच्या मानसिकतेवर असते. एखाद्या लहान मुलाकडे दोनच चॉकलेट्स असतीत तर त्यातलं एक तो दुसऱ्याला खुशीनं देईल. एखादं मूल आपल्याकडचे दोनही चॉकलेट्स देऊन टाकेल. तर दुसरे एखादे मूल त्याच्याकडं भरपूर चॉकलेट्स असूनही त्यातलं एकही दुसऱ्या कोणाला देणार नाही. इथं  ‘मुलांचे पाय पाळण्यात दिसतात’ ही उक्ती लागू पडते. देणारी मुलं, पुढं त्यांच्यावर पालकांचे चुकीचे संस्कार झाले नाहीत तर आपल्या भावी आयुष्यात नक्कीच दानशूर आणि यशस्वी होतील. कारण देणाऱ्यांकडं भरभरून, चोहोबाजूने येत असतं. त्यांच्याकडं असतं म्हणून ते देत नसतात, तर त्यांना देण्याची सवय असते म्हणून त्यांच्याकडं येत असतं. तुम्हीही तुमच्या कमाईतला थोडा भाग नियमित दान करा. हे दान तुम्ही गरजूंना, विद्यार्थ्यांना, अनाथाश्रमाला, संकटग्रस्तांना करा. ते निरपेक्ष बुद्धीनं करा. या दानाचा डांगोरा पिटू नका. मग पहा तुमच्या जीवनात काय क्रांती होते ते!


No comments:

Post a Comment